Ad will apear here
Next
आंबेडकर संघर्ष समितीतर्फे संविधानाच्या प्रतींचे वाटप
पुणे : भारतीय संविधान दिनानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने संविधानाच्या प्रतींचे वाटप करण्यात आले. भारतीय संविधान जनमानसात पोहोचावे, यासाठी दर वर्षी संविधान दिनाच्या निमित्ताने समितीचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासन क्षेत्रातील मान्यवरांना, तसेच शाळा-महाविद्यालयांत संविधानाच्या प्रती भेट देतात.

यंदा समितीतर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, उद्योजक नानासाहेब गायकवाड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. एन. एस. उमराणी, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंद, साहित्यिक वि. दा. पिंगळे यांच्यासह अनेक मान्यवरांना संविधानाची प्रत भेट देऊन संविधान दिन साजरा करण्यात आला.

या वेळी विकास कांबळे, सागर गायकवाड, सचिन गजरमल, लक्ष्मण जाधव, रामदास कांबळे, अनिल गायकवाड, गणेश कांबळे, गणेश आबनावे यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZKWBU
Similar Posts
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन पुणे : भारतीय संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ३० शैक्षणिक आस्थापनातर्फे भारतीय घटनेच्या उद्देशिकेचे (प्रीएम्बल) भव्य सामूहिक वाचन उपक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम आझम कँपस येथे २६ नोव्हेंबर २०१८ रोजी झाला.
‘बाबासाहेबांचे विचार आचरणात आणावेत’ पुणे : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्यातील कायदेतज्ज्ञ, पत्रकार, तत्त्वज्ञ, राजकारणी समजून घेऊन त्यांचे विचार आपण आचरणात आणायला हवेत. आजच्या तरुणांनी बाबासाहेबांना अभिप्रेत कार्य उभारण्यासाठी शिक्षणाकडे गांभीर्याने पाहायला हवे. तरुणांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी हा पुस्तक
सामाजिक न्याय विभागाच्या सचिवपदी कांबळे पुणे : दिल्ली येथील नॅशनल फेडरेशन ह्युमन राईट कौन्सिलच्या सामाजिक न्याय विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र सचिवपदी पुण्यातील शशिकांत कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हाती घेतलेले काम तडीस जाईपर्यंत पाठपुरावा करण्याचे त्यांचे कौशल्य लक्षात घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
‘प्रसारमाध्यमांनी लोकशाही मूल्ये जपणारी भूमिका मांडावी’ पुणे : ‘प्रसारमाध्यमांकडे विचार स्वातंत्र्य आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणात त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असून, प्रसारमाध्यमांनी लोकशाही मूल्ये जपणारी भूमिका मांडायला हवी,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व संपादक अरुण खोरे यांनी केले. ‘माध्यमांचे व्यापारीकरण होत असताना मूल्ये जपणारी माध्यमे आपले वेगळेपण टिकवून असल्याचे त्यांनी नमूद केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language